Breaking news

Eco Friendly Ganpati Bappa : मातीपासून श्रीगणेश मूर्ती तयार करण्याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

लोणावळा : श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भाजे मळवली येथे पर्यावरण पूरक अशा माती पासून श्री गणेशाची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्या प्रसारिणी सभेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, संस्थेचे कार्यवाह व शाला समिती अध्यक्ष डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह विजय भुरके, शाळा समितीचे सदस्य उस्मान इनामदार व भगवान आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

        व्हि पी एस हायस्कूल लोणावळा येथील सहशिक्षक मुकुंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना श्री गणेश मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे नियोजन कलाशिक्षक धुळाजी देवकाते व विजय कवडे यांनी केले. विद्यार्थ्यांकडून श्री गणेश मूर्तीची सुंदर रंगरंगोटी करून गणेश उत्सवात पूजन केले जाणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा मनापासून आनंद लुटला. पर्यावरण पूरक अशा या उपक्रमाला प्रशालेचे पर्यवेक्षक मकरंद गुर्जर व प्रशालेचे प्राचार्य संतोष पवार यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

इतर बातम्या