Breaking news

LPG Price Hike : गॅस दरवाढ । घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ; व्यावसायिक सिलेंडरही महागला

मुंबई : सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसला असून बुधवारी (1 मार्च) एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Price Hike) मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. बुधवारपासूनच हे नवीन दरवाढ लागू झाली आहेत.

      महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरच्या दरवाढीने सामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. आजवरचे आकडे पहिले तर गेल्या आठ वर्षांत सिलिंडरच्या किंमती सुमारे अडीचपटीने वाढल्या आहेत. मार्च 2014 मध्ये घरगुती एलपीजीची किंमत प्रति सिलेंडर 410 रुपये होती. त्यावेळी थेट लोकांच्या खात्यात अनुदान देऊन केंद्र सरकार आपल्या स्तरावर खर्चाचा काही भाग उचलत होती. आता आठ वर्षांत एलपीजीची किंमत 1102 रुपये झाली आहे. या शिवाय 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर च्या दरात 350 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईत होरपळलेल्या नागरिकांना या दर वाढीने मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर केला. यानंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे वाटत असताना आजची गॅस दरवाढ सर्वसामान्यांना चटका देऊन गेली आहे.

महत्वाच्या बातम्या वाचा -

लोणावळ्यातील या ऐतिहासिक खड्डयाचे रहस्य काय?

खंडाळ्यातील साधु वासवाणी आश्रमात रविवारी मोफत आरोग्य शिबिर

वाकसई येथील संत तुकाराम महाराज झाड पादुकास्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह

श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचा निकाल जाहिर

इतर बातम्या