अखंड हरिनाम सप्ताह । जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज झाड येथे शुक्रवार 3 मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताह

लोणावळा : जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज झाड पादुकास्थान वाकसई येथे येत्या शुक्रवार (3 मार्च) पासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे. सप्ताहाचे यंदा 27 वे वर्ष आहे. जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज (झाड) पादुका स्थान सेवा ट्रस्ट वाकसई व मासिक दिंडी समाज मावळ यांच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात दैनंदिन पहाटे 4 ते 6 वाजता काकड आरती, सकाळी 8 ते 11 वाजता गाथा पारायण, दुपारी 12 ते 1 गाथा भजन, सायंकाळी 4 ते 5 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 किर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 दरम्यान जागर असे कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहामध्ये खालील प्रवचनकार व किर्तनकार यांची सेवा होणार आहे. दि. (शुक्रवार 3/3/23) - हभप काळूराम महाराज देशमुख (प्रवचन) व हभप ज्ञानेश्वर महाराज फालके - आळंदी (किर्तन).
(शनिवार 4/3/23) - हभप जयवंत महाराज ढाकोळ - (प्रवचन) व हभप जयेश महाराज भाग्यवंत - डोंबिबली - (किर्तन).
(रविवार 5/3/23) - हभप मोनिकाताई भांगरे (प्रवचन) व ज्ञानेश्वर महाराज जवळेकर - बुलढाणा (किर्तन)
(सोमवार 6/3/23) - हभप मधूकर महाराज गराडे (प्रवचन) व हभप सोमनाथ महाराज कराळे - पैठण (किर्तन)
(मंगळवार 7/3/23) - हभप दिलीप महाराज खेंगरे (प्रवचन) व हभप विजय महाराज अडदळ - गेवराई (किर्तन)
(बुधवार 8/3/23) - हभप लक्ष्मण महाराज इंगूळकर (प्रवचन) व हभप केशव महाराज मुळीक - इंदापूर (किर्तन)
गुरुवार (9/3/23) - हभप भिमाजी महाराज भानुसघरे (प्रवचन), बिज सोहळा सकाळी 10 ते 12 हभप प्रकाश महाराज उगले - परभणी (किर्तन) व रात्री 9 ते 11 हभप कृष्णा महाराज कमाणकर - नाशिक (किर्तन)
(शुक्रवार 10/3/23) - सकाळी 10 ते 12 यावेळेत काल्याचे किर्तन हभप दीपक महाराज वादाडे - बिड यांचे होणार आहे.