Breaking news

Khandala News : साधु वासवाणी आश्रमात रविवारी मोफत अस्थिरोग, मुत्ररोग व हाडांच्या ठिसूळपणा तपासणी शिबिराचे आयोजन

लोणावळा : साधु वासवाणी आश्रम, रोग निवारण केंद्र खंडाळा येथे येत्या रविवारी (5 मार्च) रोजी मोफत अस्थिरोग, मुत्ररोग व हाडांच्या ठिसूळपणा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यत हे शिबिर होणार आहे. यामध्ये अस्थिरोगाशी संबंधित सांधेदुखी, स्नायुचे दुखणे, पोलिओ मुळे आलेली कमजोरी. मुत्ररोग तपासणीत मुतखडा, लघवीतून रक्त जाणे, लघवी पुर्ण न होणे, किडणी रोग. हाड‍ांचा ठिसूळपणा व हाडांच्या इतर समस्यांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन साधु वासवाणी आश्रमच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या