Breaking news

आमदार शेखर निकम यांचा आंबव पोंक्षे येथे भव्य सत्कार संपन्न

संगमेश्वर/ प्रतिनिधी (विलास गुरव) : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथे चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा नुकताच पार पडला.

     यावेळी व्यासपीठावर चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे मुंबई संपर्क प्रमुख सुरेश घडशी, गावकरी मोहन भुवड, संदेश पोंक्षे, सरपंच शेखर उकार्डे, महेश बाष्टे, प्रकाश वीर, शांताराम भायजे, तसेच युवक राष्ट्रवादी चे जिल्हा कार्याध्यक्ष सुशील भायजे, अक्षय चव्हाण, तुकाराम मेस्त्री, संतोष गोटेकर, मंगेश मांडवकर, शशिकांत घाणेकर, शांताराम नेटके, दीपक जाधव, दीपक शिगवण, राजेंद्र जाधव, संतोष विभूते, प्रिया सुवरे, निधी भायजे, गोपाळ चाळके, संजय पकडे, सुनील घडशी, मनोज गुरसळे, प्रकाश धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.

    आंबव पोंक्षे ते सरंद,आंबव पोंक्षे ते आरवली तसेच मुख्य रस्त्यापासून कदमवाडी, भुवडवाडी, पकडेवाडी, सुतारवाडी, जुवळेवाडी कडे जाणारे रस्ते डांबरीकरण झाले आहे. भुवडवाडी, पकडेवाडी साठी स्वतंत्र डीपी ची सोय आदी विकास कामे आमदार शेखर निकम यांनी कालमर्यादेत पूर्ण केली. यामुळे आंबव पोंक्षे ग्रामस्थ मंडळींतर्फे आमदार शेखर निकम यांचा सन्मान करण्यात आला.

     आ. शेखर निकम यांचे आगमन होताच घडशीवाडी ते ग्रामदेवता मंदिर पर्यंत शेकडोंच्या उपस्थितीत डीजे च्या तालावर व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर आ. शेखर निकम यांनी ग्रामदेवता मंदिर  व हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. नंतर आंबव पोंक्षे ते आरवली या रस्त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात श्रीफळ वाढवून उदघाटन करण्यात आले.

      आंबव पोंक्षे ग्रामस्थ मंडळींतर्फे भव्य हार, पुष्पगुच्छ श्रीफळ, शाल, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीची पंचक्रोशीला हेवा वाटेल अशी सर्व सोयींनी युक्त अशी इमारत बांधू असे वचन दिले. एखाद्या निवडणुकीनंतर मिरवणूक काढावी अशी मिरवणूक आंबव पोंक्षे गावाने काढली. यामुळे मी भारावून गेलो असल्याचे आ.शेखर निकम यांनी सांगितले. आंबव पोंक्षे गावची व परिसरातील जी जी कामे प्रलंबित आहेत ती प्रामाणिक पणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन असे नमूद केले.

     यावेळी सुरेश घडशी, सदानंद जोगले, सुशील भायजे, शशिकांत घाणेकर, अक्षय चव्हाण, प्रिया सुवरे आदीनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार गौरव पोंक्षे यांनी मानले.


इतर बातम्या