मुंबईत भव्य नवकार महामंत्र जप कार्यक्रम: राज्यपाल, मंत्री, धार्मिक नेते आणि जैन ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : संपूर्ण जगामध्ये एकाच वेळी नवकार महामंत्राचा सामूहिक जप करण्याची ऐतिहासिक संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या पुढाकाराने राज्यातील मान्यवर जैन ट्रस्ट सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. समस्त महाजन ट्रस्टतर्फे परेशभाई शहा आणि प्रकाश पोरवाल यांनी या कार्यक्रमात प्रतिनिधित्व केले. मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल महाभीम सी. पी. राधाकृष्ण, बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, राज्याचे सांस्कृतिक मंत्री मंगलप्रभा लोढा, राष्ट्रसंत श्री लोकेश मुनिजी, शीख समाजाचे अध्यक्ष व माजी पोलीस महासंचालक श्री पसरीचा, तसेच बौद्ध धर्मातील ऑल इंडिया भिकू संघाचे अध्यक्ष बादट राहुल बोधी हे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. भिकू संघाचे अध्यक्ष बादट बोधी यांनी भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे शांततेचे कार्य एकाच काळातील असल्याचे सांगितले. श्री पसरीचा यांनी भारतातील धार्मिक विविधता असूनही सर्व धर्मांच्या विचारांमध्ये साम्य असल्यावर भर दिला.
राज्यपाल राधाकृष्ण यांनी एकाच वेळी संपूर्ण जगभरात होणाऱ्या नवकार महामंत्र जपाला ऐतिहासिक क्षण ठरवत जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असे मत व्यक्त केले. तर राज्यपाल खान यांनी जैन आणि हिंदू धर्माच्या शांतता प्रिय शिकवणीचे महत्त्व अधोरेखित करत मानवतेच्या कल्याणासाठी त्याचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातून आलेले जैन समाजातील 150 मान्यवर अध्यक्ष उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ‘जीतो’ या जैन संघटनेच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.