Breaking news

आनंदाची दिवाळी l श्रीराम मंडळ गवळीवाडा यांच्या वतीने खंडाळा अंध वृद्ध आश्रमात दिवाळी फराळाचे वाटप

लोणावळा : श्रीराम मंडळ गवळीवाडा यांच्या वतीने घराघरातून फराळ गोळा करत तो सालाबाद प्रमाणे खंडाळा येथील अंध वृद्धाश्रमात वाटप करण्यात आला. खंडाळा अंध वृद्धाश्रमात 79 अंधवृद्ध राहत आहेत. दिवाळी हा ज्या पद्धतीने दिव्यांचा सण आहे तसाच तो गोडाधोडाचा व फराळाचा सण आहे. घरोघरी विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ दिवाळी सणाच्या निमित्त बनवले जातात. अंध वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना या फराळाचा आनंद घेता यावा याकरिता मागील अनेक वर्षांपासून श्रीराम मंडळ गवळीवाडा यांच्या वतीने नरक चतुर्दशीच्या दिवशी हा फराळ गोळा करत वाटप करण्यात येतो.

        यावर्षी तरुण कार्यकर्त्यांच्या सोबतच गवळीवाडा विभागातील लहान मुले देखील या अंध वृद्धाश्रमात फराळ वाटपासाठी आली होती. त्यानिमित्त त्यांनी अंध वृद्धांची भेट घेतली. याठिकाणी ते कशा पद्धतीने जीवन जगतात याची माहिती घेतली. त्यांची त्या ठिकाणी असलेली राहण्याची, जेवणाची व्यवस्था कशी असते याची माहिती घेतली. तसेच अंध वृद्ध या ठिकाणी हातमागावर ज्या वस्तू बनवतात त्याची देखील माहिती घेत सर्व बाल चमुंनी या वृद्ध आजी-आजोबांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

इतर बातम्या