Breaking news

कुणेनामा ग्रामपंचायत सदस्यावर अपात्रतेची कारवाई; जात वैधता प्रमाणपत्र ठरविले अवैध

लोणावळा : येथील कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सदस्याचे जात वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे यांनी अवैध ठरवत जप्त केल्याने सागर मधुकर उंबरे या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. याबाबत मावळ तालुका गट विकास अधिकारी एस.पी. भागवत यांनी कुणेनामा ग्रामपंचायतीला पत्र पाठवत हा आदेश संबंधिताला तात्कला बजावण्यात यावा असे सांगितले आहे.

      दीड वर्षापूर्वी कुणेनामा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यामध्ये सागर मधुकर उंबरे हे विजयी झाले होते. मात्र त्यांनी त्यावेळी सादर केलेले जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरविले आहे. सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत असल्याने त्यांचे प्रमाणपत्र रद्द ठवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पद (20 मार्च) आदेश पारित केल्यापासून रद्द झाले आहे, असे गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

इतर बातम्या