Breaking news

वडगाव येथील तहसील कार्यालय तळेगावला हालविण्यास नागरिकांचा विरोध

वडगाव मावळ (प्रतिनिधी) :  वडगाव येथील तहसील कार्यालय तळेगावला हलविण्यास वडगाव, कामशेत लोणावळा या तिन्ही शहरासह आंदर, नाणे, पवन या तिन्ही मावळातील सर्व पक्षीय नागरिकांनी विरोध केला आहे. 

      वडगाव मावळ येथे नविन मध्यवर्ती इमारत बांधण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतुन 18 कोटी रूपये मंजूर झाले. ते काम सुरू करण्यासाठी तहसील, पोलिस ठाणे, भुमीअभीलेख व वन ही चार शासकीय कार्यालये एक महिन्यात खाली करून आपला संसार दुसरीकडे हलविण्यात यावा असा आदेश बांधकाम खात्याने दिला होता. त्यानंतर जागेची शोधाशोध सुरू झाली आहे. तहसिल कार्यालय तळेगावला हालविण्याच्या हालचाली सुरू झाल्याने तहसील कार्यालय व पोलिस ठाणे वडगाव बाहेर नेण्यास नागरिकांचा विरोध केला आहे.

    तिन्ही मावळासह शहरातील नागरिकांची विविध महत्त्वाची कामे तहसील कार्यालयात असतात. वडगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ते सोईचे आहे. त्यामुळे तहसील कार्यालय हे तळेगाव दाभाडे येथे न नेता पंचायत समिती अथवा वडगाव शहरातच शिप्ट करावे. नविन ईमारत होण्यास तीन वर्षाचा कालावधी जाईल. कार्यालत तळेगावात गेल्यास याकाळात नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. आंदरमावळ ते तळेगाव हे अंतर 50 ते 60 किलोमीटर आहे. पदरमोड खर्च करून वेळ वाया जाईल या सर्व बाबींचा विचार करून तहसील कार्यालय नविन काम होईपर्यंत वडगाव येथेच शिप्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, तालुका काॅग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, उपनगराध्यक्षा पुजा वहिले, मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर, सुभाषराव जाधव, अंकुश आंबेकर, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, तानाजी दाभाडे, भाजपचे प्रसिद्ध प्रमुख अनंता कुडे, यांच्यासह अन्य नागरिकांनी आमदार सुनील शेळके व तहसीलदार मधुसुदन बर्गे यांच्या कडे केली आहे. 

इतर बातम्या