Lonavala News : शिवसेवा प्रतिष्ठानच्या लहान मुलांनी मावळच्या राज्यासमोर म्हंटले अथर्वशीर्ष

लोणावळा : शिवसेवा प्रतिष्ठानच्या लहान मुलांनी आज मावळच्या राजासमोर अर्थात श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या बाप्पांसमोर अथर्वशीर्षाचे पठण केले. अतिशय गोड व सुंदर आवाजात हे पठण करण्यात आले. मागील काही दिवसांपासून लोणावळ्यात शिवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लहान मुलांचे संस्कार वर्ग घेतले जातात या संस्कार वर्गामध्ये शिकत असलेल्या मुलांनी मावळचा राजा अशी ओळख असलेल्या श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टच्या बापांसमोर आज हे पठण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. मागील काही महिन्यांपासून संस्कार शिबिरात दिलेल्या संस्कारांचे हे फलित असल्याचे प्रतिक्रिया शिवसेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उत्सव समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.
उद्या शनिवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता श्री शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट बाप्पांसमोर सुनील बोके व त्यांच्या सहकार्याकडून सुमधुर गीते सादर केली जाणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा व बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.