खंडाळा गावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी; वडू गावातून आणली शिवज्योत खंडाळा परिसरात शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक

मावळ माझा न्युज नेटवर्क : शिवजयंती उत्सव मंडळ खंडाळा यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खंडाळा गावात विविध उपक्रमांनी साजरी केली. यावर्षी वडू गावातून मंडळाच्या वतीने शिवज्योत प्रज्वलित करत आणण्यात आली होती. लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन करत सदरचे शिवज्योत खंडाळा गावात आणण्यात आली. खंडाळा गावामध्ये या शिवज्योतीची पूजन करत शिवप्रतिमेची पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये भव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली होती मोठ्या संख्येने खंडाळा परिसरतील नागरिक, तरुण, महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
शिवजयंती महोत्सवाच्या निमित्त संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा क्रमांक 10 आणि माध्यमिक विद्यालय स्तरावर वकृत्व, रांगोळी, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच दिनांक 16 मार्च रोजी दुपारी दोन ते पाच रांगोळी आणि किल्ले स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. सोमवार दिनांक 17 मार्च रोजी वडू (तुळापूर) हवेली येथून शिवज्योत आणून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ होता लोणावळा येथे पुष्प हार अर्पण केल्यानंतर ज्योत खंडाळा येथे कार्यक्रम स्थळी आल्यानंतर पूजन करण्यात आले. तदनंतर सत्यनारायणाची महापूजा करून सायंकाळी सात वाजता शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक शुभारंभ पोलीस निरीक्षक लोणावळा शहर सुहास जगताप, पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण किशोर धुमाळ, पोलीस सहाय्यक निरीक्षक लोणावळा शहर राहुल लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी दीपक मसुरकर, विश्वस्त खजिनदार मच्छिंद्र खराडे, विश्वस्त सरचिटणीस भालचंद्र खराडे, विश्वस्त सदस्य माजी नगरसेवक सन 2025 कार्यकारी अध्यक्ष शुभम बनसोडे, संजय कदम, राजेंद्र सपकाळ, सचिन वाळके, प्रसाद शिर्के, हरीश देवरा, वसंत कदम, प्रकाश पवार, श्रीमती तारामती शिर्के, बाबू पवार, संतोष गोणते, किशोर वाघमारे, चिरा खराडे, राजेश महाडिक, नितीन सोनवणे, दिनेश खराडे, संतोष वाळके, गणेश सपकाळ, ओंकार खराडे, निशान शिरसागर, भावेश खराडे, रोहित पांढरे, रोहित गुरव, गणेश पांढरे, प्रती खराडे, ऋषभ ओसवाल, चैतन्य खराडे, कार्तिक घाडगे, तेजस खराडे, मयूर पवार, सिद्धांत तावरे, ओमकार दळवी, सतीश गोनते, विजय चौरे, रघु सपकाळ, आकाश बाळकुदरी, आदित्य सपकाळ, विघ्नेश सपकाळ, मयंक खराडे, पंकज पवार, भूषण सावंत, पार्थ महाडिक, ओम डोंबले, दर्शील खराडे, यश सोनवणे, आकाश पवार, अक्षय पवार, सौरभ शिंदे, आदित्य पताडे, आकाश सोनवणे, साई सपकाळ, सुमित राव, सोहम महाडिक, आदिराज महाडिक, यश कदम, स्मित पालवे, रोहित चव्हाण यासह लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी नगरसेवक जीवन गायकवाड, समाजसेवक दत्ता दळवी, नरेंद्र कचरे, माजी नगरसेविका पूजाताई गायकवाड, राजेंद्र सरोदे, इंदुरीकर जैन पंचायत चे सागर जैन, स्वतमल जैन, सनी जैन, डॉक्टर चंपक जैन, पंकज काळे, विनोद ओसवाल, उद्योगपती सनी दळवी, सनी कचरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पारंपारिक वाद्य, मुंबई बँजो बँड, डीजे, हलगी यासह नानाविध प्रकाश झोतात मिरवणूक पार पडली. मंगळवार 18 मार्च रोजी महिलांसाठी हळदीकुंकू, मुलांसाठी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व शिवजयंती उत्सवात घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ पार पडला. तदनंतर छावा चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले.