Accident Breaking : वेहेरगाव रोडवर कार व पिक अपचा अपघात

लोणावळा : कार्ला फाट्यावरुन आई एकविरा देवीच्या गडाकडे जाणार्या वेहरगाव रोड वर आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक स्विफ्ट कार व पिक अप टेम्पो व दुचाकी यांच्यात अपघात झाला आहे. दारुच्या नशेत असलेल्या पिक अप टेम्पो चालकाने रस्ता दुभाजक तोडत विरुद्ध लेनवर जात समोरुन वेहेरगाव कडून येणारी स्विफ्ट कार व दुचाकीला धडक दिली. या अपघातात एकाच्या पायाला गंभिर मार लागला असून दोन महिला जखमी झाल्या आहेत. वेहरगाव रोडच्या रुंदीकरण व क्राँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. या रोडवर सदरचा अपघात झाला आहे. रोडचे काम सुरु असल्याने काही ठिकाणी डायव्हर्जन देण्यात आले आहेत. वाहन चालकांनी अंतर्गत रस्त्यावर वाहने कमी वेगाने चालविणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे या अपघातावरुन समोर येत आहे. आतापर्यंत या रोडवर झालेला हा तिसरा चवथा अपघात आहे. अपघातानंतर जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात हालविण्यात आले आहे.