Breaking news

EXPRESSWAY ACCIDENT : सोमटणे जवळ कारचा भिषण अपघात; रस्ता सुरक्षा दुभाजक घुसले कारमध्ये

लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सोमाटणे येथे एका कारचा आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सुरक्षा दुभाजकाचा जाड पत्रा कार मध्ये आरपार घुसला. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एक जण जखमी झाला आहे.

    युवा अमिताब मुजामदार (वय 50, रा. मुंबई), निलकुसुम यौका (वय 32, रा. मुंबई), सारा अमिताब मुजामदार (वय 25, रा. मुंबई) अशी या अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांची नावे आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली कार क्र. (23 BH 5560 A) च्या चालाकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सुरक्षा दुभाजकावर आढळली. यामध्ये दुभाजकाचा पत्रा तुटून तो थेट कार मध्ये घुसला सदर पत्रा कार मधून आरपार झाला, सुदैवाने या भीषण अपघातात जीवित हानी झाली नाही एक जण जखमी झाला असून त्याच्यावर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

     काल देखील याच भागामध्ये भरधाव वेगातील कार एका उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. हे दोन्ही अपघात अतिवेगामुळे झाले आहेत. द्रुतगती महामार्गावर अतिवेगामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी वेग नियंत्रणासाठी ताशी 80 ते 100 किलोमीटर वेग मर्यादा ठेवली आहे. असे असताना देखील काही वाहन चालक वेग मर्यादेचे उल्लंघन करत वाहने चालवत अपघाताला निमंत्रण देत आहेत.

महत्वाच्या बातम्या वाचा -

लोणावळ्यात दिव्यांगाना मिळणार उदरनिर्वाह भत्यापोटी 30 हजार रुपये

संवेदना या शब्दाची जाणीव गुन्हेगाराला असतेच असे नाही - अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे

एक्सप्रेस वेवर भिषण अपघातात तिघांचा मृत्यू 

वैष्णवी रसाळ सौभाग्यवती 2023 च्या मानकरी

आता आधारकार्ड करा आँनलाईन अपडेट ते देखील मोफत

इतर बातम्या