Breaking news

आनंदवार्ता । लोणावळा शहरात दिव्यांगाच्या उदरनिर्वाह भत्त्यात वाढ; आता वर्षाकाटी मिळणार 30 हजार रुपये

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद हद्दीमधील पात्र दिव्यांग व्यक्तींच्या उदरनिर्वाह भत्त्यामध्ये लोणावळा नगरपरिषदेकडून वाढ करण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी मिळणारा 18000 रुपये वार्षिक उदरनिर्वाह भत्ता इथून पुढे 30 हजार रुपये असा मिळणार आहे. 1500 रुपये वरून आता हा भत्ता मासिक 2500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडित पाटील यांनी दिली.

     लोणावळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव व माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी 20 डिसेंबर 2022 रोजी लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देत वाढत्या महागाईचा विचार करिता दिव्यांग बांधवांच्या उदरनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ करत तो 36 हजार रुपये करण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी मागणीचा सकारात्मक विचार करत तात्काळ 2022 - 23 च्या आर्थिक वर्षात अंध अपंग समस्या योजना 5 टक्के राखीव निधीमधून दिव्यांग उदरनिर्वाह भत्त्यात वाढ केली आहे. याचा लाभ लोणावळा शहरातील जवळपास दोनशे च्या आसपास पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या वाचा -

एक्सप्रेस वेवर भिषण अपघातात तिघांचा मृत्यू 

त्या जखमी बाल शिव भक्ताचा उपचारादरम्यान मृत्यू 

वैष्णवी रसाळ सौभाग्यवती 2023 च्या मानकरी

आता आधारकार्ड करा आँनलाईन अपडेट ते देखील मोफत

कंटेनरच्या धडकेत वाकसई गावातील दुचाकी चालक व शाळकरी मुलगी जखमी

इतर बातम्या