Breaking news

BREAKING NEWS : पुणे जिल्ह्यातील बारावी पर्यतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहिर - जिल्हाधिकारी पुणे

लोणावळा : प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र, पुणे यांचेकडील संदेशान्वये दिनांक 14 जुलै व दिनांक 15 जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात सुरु असलेला व पुढील दोन दिवसात होणारा जोरदार पाऊस ध्यानात घेता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी त्यांना होवू नये याकरीता पुणे जिल्ह्यातील (इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर, पुरंदर हे तालुके वगळून) इतर सर्व तालुक्यातील इयत्ता 12 वी पर्यतच्या (प्री स्कुल प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक) सर्व शाळांना दिनांक 14 जुलै ते 16 जुलै पर्यत सुट्टी जाहिर करत असल्याचे परिपत्रक पुणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे डाॅ. राजेश देशमुख यांनी आज काढले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील संदर्भ क्र. 2 नुसार, सदर परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक 2 मधील शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून पुणे जिल्ह्यातील (इंदापूर, बारामती, दौड, शिरूर व पुरंदर हे तालुके वगळून इतर सर्व तालुक्यातील प्री स्कुल प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना गुरुवार दिनांक 14/7/2022 ते शनिवार दिनांक 16/7/2022 रोजी पर्यत सुट्टी जाहीर करीत आहे. तथापि, सदर कालावधीमध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्था करायची असल्याचे या आदेशात म्हंटले आहे.

इतर बातम्या