ठाकूरसाई येथील सरपंच नारायण बोडके यांच्या घरात विराजमान झालेले बाप्पा

मावळ : पवन मावळातील ठाकूरसाई गावचे सरपंच नारायण बोडके यांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
बाप्पाच्या स्वागतासाठी त्यांनी आकर्षक सजावट केली आहे. यामध्ये "खडू पेन्सिल रुसली, रुसला रे माझा फळा...सांगा कधी होईल चालू, आवडीची शाळा" असा संदेश देणारा देखावा तयार केला आहे.