Breaking news

Lonavala : बाळासाहेब फाटक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांची हजेरी

लोणावळा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोणावळा शहर प्रमुख व लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती बाळासाहेब फाटक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला महाविकास आघाडीच्या शहरातील नेते मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना सर्वांनीच बाळासाहेब तुम्ही शहराचे नगरसेवक नव्हे तर नगराध्यक्ष व्हा अशा शुभेच्छा दिल्या.

     शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब फाटक यांचा अभिष्टचिंतन सोहळा ओम फिटनेस क्लब भांगरवाडी या ठिकाणी पार पडला. या सोहळ्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख महेश केदारी, मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष नंदकुमार वाळंज, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष विलास बडेकर, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरण गायकवाड, शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, लोणावळा शहर महिला अध्यक्षा कल्पना आखाडे, परेश बडेकर, संजय भोईर, मारुती खोले, जयवंत दळवी, उद्योजक बंडूभाऊ फाटक, नंदू फाटक, लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र कल्याणजी, संजय आडसुळे, बाबुभाई शेख, ज्ञानेश्वर येवले, आमन पठाण यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक व बाळासाहेब फाटक यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

      शांत, संयमी व मितभाषी स्वभावाचे बाळासाहेब फाटक हे शिवसेनेचे पूर्वेपासूनचे कट्टर समर्थक आहेत. शिवसेना पक्ष वाढीसाठी त्यांनी लोणावळा शहरांमध्ये विविध उपक्रम राबवत कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वासाचे नाते तयार केले. त्यांच्या याच विश्वासावर व नेतृत्वावर शिवसैनिकांनी विश्वास दाखवत महाराष्ट्राच्या राजकारणात व शिवसेना पक्ष संघटनेत उलथा पालथ झालेली असताना देखील लोणावळा शहरांमधील शिवसैनिक डगमगला नाही. संघटनेच्या माध्यमातून तसेच शिक्षण मंडळाच्या माध्यमातून, मावळ वार्ता फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी शहरातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्व पक्षातील नेते मंडळी उपस्थित होती. सर्वांनीच त्यांना नगरसेवक नव्हे तर नगराध्यक्ष व्हा अशा शुभेच्छा दिला. यावेळी भारावून गेलेले बाळासाहेब फाटक यांनी सर्वांचे आभार मानत लोणावळाकर जनता व पक्ष संघटना देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडू असा शब्द दिला.

इतर बातम्या