Breaking news

लोणावळा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. विलास पाटील यांची नेमणूक

लोणावळा : लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयाच्या  प्रभारी प्राचार्य पदी डॉ. विलास पाटील सहयोगी प्राध्यापक (वनस्पती शास्त्र) यांची नियुक्ती करण्यात आली.

      यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, सचिव दत्तात्रय पाळेकर, विश्वस्त व सल्लागार अ‍ॅड. नीलिमा खिरे, विश्वस्त दत्तात्रय येवले, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. दिगंबर दरेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. विलास पाटील यांचे अभिनंदन केले. डॉ. विलास पाटील यांनी पुणे विद्यापीठाची PHD पदवी प्राप्त केली आहे. गेले 30 वर्ष वरिष्ठ महाविद्यालयात पदवी व पदवीत्तर विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. उपप्राचार्य म्हणून 12 वर्षाचा अनुभव आहे. पदवीच्या विज्ञान विद्यार्थ्यांसाठी अनेक क्रमिक पुस्तके लिहिली आहेत. त्याचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित आहेत. PHD विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून पुणे विद्यापीठाकडून त्यांना मान्यता मिळाली आहे. काव्यामित्र संस्थेकडून त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच भारत सरकारचे एक पेटंट मिळाले आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सेमिनार मध्ये रिसोर्स परसन म्हणून देखील त्यांचा गौरव झाला आहे. लोणावळा महाविद्यालयातील सर्व शाखांची गुणवत्ता वाढविण्यासोबत संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे पाटील यांनी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले.

इतर बातम्या