Breaking news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा नगरपरिषदेला रुग्णवाहिका भेट

लोणावळा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेला आज सुसज्ज रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची चावी व कागदपत्रे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, महाराष्ट्र प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष दीपक मानकर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष अजिंक्य कुटे, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेश मेहता, रवी भोईने, आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंचाचे नारायण मालपोटे, धनंजय काळोखे, राजु दौंडकर, दीपक मालपोटे, राष्ट्रवादी पक्षाचे सलिमभाई मण्यार, वरिष्ठ उपाध्यक्ष आदित्य पंचमुख, ओबीसी अध्यक्ष समीर खोले, सामाजिक न्याय अध्यक्ष जयेश देसाई, अल्पसंख्याक मावळ अध्यक्ष रिजवान खान, उपाध्यक्ष निलेश घोणे, मुझमील शेख, मुझमील सिकिलकर, अभय परदेशी यांच्यासह सुनील आण्णा शेळके युवा मंच सदस्य सर्व सेल अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

   कोरोना या महामारीचा सामना करण्यासाठी आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मावळ तालुक्यात पाच रुग्णवाहिका कार्यरत असून विभागावार त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे देण्यात आल्या आहेत. लोणावळा शहर‍च्या लोकसंख्येचा विचार करता लोणावळा नगरपरिषदेकडे पुर्णवेळ रुग्णवाहिका असावी याकरिता अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही रुग्णवाहिका नगरपरिषदेकडे सुपुर्द करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषद शाळा क्र. 1 याठिकाणी कोविड रुग्णालय चालवत आहे. याठिकाणी सदर रुग्णवाहिका उपयुक्त ठरेल असे अध्यक्ष जीवन गायकवाड यावेळी म्हणाले.

इतर बातम्या