AAI KALUBAI : हाकेला धावणारी आई काळूबाई

लोणावळा (मंजुश्री वाघ) : भक्तांच्या हाकेला धावणारी आई काळूबाई भैरवनाथ नगर येथील मंजुश्री वाघ यांच्या घरात विराजमान आहे. पुर्वी कोंडे परिवार व नंतर वाघ परिवारात देवी विराजमान आहे. साधारणतः 25 वर्षापासून देवीचे हा ठाण असून देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा केली जाते. नवरात्र उत्सव काळात देवीची नऊ दिवस मनोभावे सेवा केली जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या मुख कमलावर वेगवेगळा भाव पहायला व अनुभवायला मिळतात. तसेच पौष महिन्यात देवीचे जागरण व धार्मिक कार्य मोठ्या उत्साहात केले जाते. या दोन्ही वेळी मोठ्या प्रमाणात भाविक याठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात.
सत्वगुणाचा अवतार असलेली आई काळूबाई समोर भक्तांनी मनोभावे मागितलेले मागणे ती पुर्ण करते असा भक्तांचा अनुभव असून संकल्पपुर्ती नंतर अनेक भाविक यावर्षी नवस फेडण्यासाठी येत असतात. अतिशय जागृत असे हे देवीचे ठिकाण आहे. वाघ कुटुंबातील सदस्य देवीची मनोभावे सेवा करत असून देवीचा चांदीचा मुखवटा तयार करण्यात आला आहे.