Breaking news

Accident Breaking News : कामशेत खिंडीत कंटेनर, कार व दुचाकी यांचा भिषण अपघात

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कामशेत खिंडीत आज कंटेनर, कार, दुचाकी यांच्यात भिषण अपघात झाला. यामध्ये तीन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून तीन्ही वाहनांमधील जखमींना उपचारासाठी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेला कंटेनर हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजक तोडत विरुद्ध लेनवर समोरून येणारी कार व दुचाकी यांना धडक देत खिंडीमध्ये खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या धडकेमध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून कंटेनर वरील लोखंडी कॉइल व चालकाचे केबिन तुटून लांब जाऊन पडली आहे. अपघाताची माहिती समजतात कामशेत पोलीस तसेच स्थानिक नागरिक वाहन चालक यांनी घटनास्थळावर जाऊन तात्काळ जखमींना उपचारासाठी रवाना केले आहे तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करत रस्ता रहदारीसाठी मोकळा केला आहे.इतर बातम्या