Breaking news

Ekvira Devi Palkhi : कार्ला गडावर रंगला आई एकविरा देवीचा मानाचा पालखी मिरवणूक सोहळा !

पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी, आग्री, सिकेपी, सोनार अशा विविध समाजाचा कुलस्वामिनी असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीचा मानाचा पालखी सोहळा मंगळवारी सायंकाळी 6 वाजता कार्ला गडावर उत्साहपूर्ण वातावरणार पार पडला. आई माऊलीचा उदो… उदो…, आई आयलो… च्या नामघोषांनी अवघा कार्ला गड दुमदुमला होता. पालखी मिरवणूक सोहळा शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन, तालुका प्रशासन व नवनियुक्त विश्वस्त मंडळ यांनी नियोजन केले होते. कडक पोलीस बंदोबस्तात पालखीचे मानकरी असलेल्या चौल, आग्राव व ठाणेकर यांनी पालखीला खांदा लावत आई राजा उदो उदो चा गजर केला. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी व सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी गडावर तुफान गर्दी केली होती. गडावर पारंपारिक वाद्यांच्या गजरात पालखी सोहळा पार पडला. हजारोंच्या संख्येने भाविक हा सोहळा पाहण्यासाठी गडावर आले होते. बुधवारी पहाटे तेलवनाने देवीच्या चैत्री यात्रेची सांगता झाली. मानकरी महिलांनी देवीच्या गाभार्‍यात बसत देवीचे तेलवन केले. हा सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटे गडावर भाविकांनी गर्दी केली होती.

पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

     महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीची चैत्री यात्रा व पालखी सोहळा पाहण्यासाठी यावर्षी प्रचंड गर्दी झाली होती. कोकण भागातून शेकडो पायी पालख्या गडावर आल्या होत्या. काही दिवस व कित्येक तास पायी प्रवास करत भाविक कार्ल्यात दाखल झाले होते. मोठ्या श्रद्धेने व मनोभावे भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. अनेकांनी नवस फेडले. यात्रेकरिता कार्ला व वेहेरगावचा परिसर सजला होता. हारफुले, प्रसाद, कूंकू व खेळणी विक्रेते यांची दुकाने साहित्यांनी सजली होती. येणार्‍या भाविकांना त्रास होऊ नये याकरिता तालुका प्रशासन व पोलीस विभाग यांच्याकडून सातत्याने विविध विभागांच्या बैठका घेत नियोजन करण्यात आले होते. गुरव समाजाचे प्रतिनिधी व देवस्थानचे विश्वस्त नवनाथ देशमुख यांच्या हस्ते देवीचा मुखवटा पालखीत ठेवण्यात आला तर मानकरी मंडळींनी खांदा लावला.

पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 यात्रेचे नियोजन

 यात्रा काळात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य व सुलभ प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मावळचे  तहसिलदार मधुसूधन बर्गे  लोणावळा पोलिस उपविभागीय आधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ, वेहेरगावच्या सरपंच व विश्वस्त अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, विश्वस्त नवनाथ देशमुख, मारुती देशमुख, संजय गोविलकर, सागर देवकर, विकास पडवळ, महेंद्र देशमुख, मंडल आधिकारी माणिक साबळे, तलाठी मिरा बो-हाडे, वनविभाग आधिकारी प्रमोद रासकर, एकविरा देवस्थान व्यवस्थापक मंगेश गायकवाड, पोलिस पाटील अनिल पडवळ  तसेच  विविध शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन यात्रेचे नियोजन केले गेले आहे. 

पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कायदा व सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात 

यात्रे दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये तसेच यात्रा काळात कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मावळ तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.  यात्राकाळात  कार्ला परिसरातील गावात तीन दिवस पूर्णपणे दारुबंदी तसेच यात्राकाळात ध्वनी प्रदुषणावर अंकुश ठेवण्यासाठी गडावर डीजे व फटाके  वाजविण्यास बंदी करण्यात आली आहे.  पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ  यांच्यासह चार पोलिस निरिक्षक, 30 सहायक पोलिस निरिक्षक, 350 पोलिस कर्मचारी, होमगार्ड, शिघ्र पोलिस दल तुकड्या, स्ट्रायकिंग पथक विविध  सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी अशाप्रकारचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आगरी कोळी मेडिकोज कडून वैद्यकीय सुविधा

आगरी कोळी मेडिकोज कडून यात्रेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयासमोर हा मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता. डाॅक्टर व मेडिसिन उपलब्ध करुन देण्यात आले होते.

पालखी सोहळ्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा



इतर बातम्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; यंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर