भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन

तळेगाव दाभाडे : अहिंसेचे प्रतीक भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्ताने जैन सोशल ग्रुप व रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मायमर मेडिकल कॉलेज व गरवारे ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
हे शिबिर तळेगाव दाभाडे येथील जैन भवन येथे आयोजित करण्यात आले असून, नागरिकांना विनामूल्य सेवा देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. किरण ओसवाल व जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री. हितेश राठोड यांनी केले आहे.
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रो. राकेश ओसवाल तर सहप्रकल्प प्रमुख रो. विनोद राठोड आहेत. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जैन सोशल ग्रुपचे प्रकल्प प्रमुख श्री. राजेंद्र शहा यांनी केले आहे.