Breaking news

तळेगावातील डॉ. आंबेडकर स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही - आमदार शेळके

तळेगाव दाभाडे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक वास्तू लवकरच राष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या रूपात उभी राहणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.

 

      डॉ. आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार शेळके म्हणाले, “या ऐतिहासिक वास्तूच्या विकासासाठी राज्य शासनाने वेळोवेळी निधी दिला आहे. आता ही वास्तू राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावी यासाठी लागणारा निधी मी स्वतः पाठपुरावा करून उपलब्ध करून देईन. निधी कमी पडू दिला जाणार नाही.”

       तळेगाव दाभाडे येथील ‘संविधान भूमी’ म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याशी संबंधित असून, ती सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्थळ म्हणून गौरवली जाते. बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या आणि नवीन पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या स्मारकात तिचे रूपांतर करण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंचशील नगर मित्र मंडळ, मारुती चौक, तळेगाव दाभाडे आणि रमाकांत तरुण मंडळ, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिवादन समारंभ, बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित व्याख्याने व जनजागृतीपर उपक्रमांचा समावेश होता.

इतर बातम्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; यंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर