Breaking news

वेहेरगाव येथे भव्य बैलगाडा शर्यतीत 'भुंगा' व 'महेरबान' ठरले आई एकविरा देवी केसरी 2025 चे मानकरी

लोणावळा : श्री क्षेत्र एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधून वेहेरगाव येथे प्रथमच तीन फेऱ्यांच्या ओपन मैदानात भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक शर्यतीत ‘भुंगा’ व ‘महेरबान’ या जोडीने आई एकविरा देवी केसरी 2025 चा मान पटकावला.

समस्त ग्रामस्थ वेहेरगाव व वेहेरगाव बैलगाडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल पाचशे बैलगाड्यांनी सहभाग घेतला. मावळ तालुक्यात अशा स्वरूपाचे तीन फेऱ्यांचे मैदान पहिल्यांदाच साकारण्यात आले होते, त्यामुळे बैलगाडा शौकिनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले – अमरनाथ बदलापूर कोहिजेगाव येथील सावकार ग्रुपचे ‘भुंगा’ (कु. आर्या मिलिंद पाटील) आणि कान्हा पाटील व दीपक चिरले यांचा ‘महेरबान’. या जोडीने उत्कृष्ट प्रदर्शन करत ‘आई एकविरा देवी केसरी 2025’ किताबावर आपले नाव कोरले.

इतर विजेते पुढीलप्रमाणे:

  • द्वितीय क्रमांक: लक्ष्या व शिवा
  • तृतीय क्रमांक: रायफल व पक्ष्या (घरचा साज)
  • चतुर्थ क्रमांक: सिकंदर व बगिरा
  • पंचम क्रमांक: ओम व माण्याभाई
  • सहावा क्रमांक: सोन्या व हारण्या
  • सातवा क्रमांक: हारण्या नखऱ्या MG 46
  • आठवा क्रमांक: तुफान व माणिकराव

इतर बातम्या

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; यंदाचा कलागौरव पुरस्कार अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेते प्रसाद खांडेकर यांना जाहीर