Adhar Card Camp : नांगरगाव आधार कार्ड कॅम्प मध्ये 80 जणांनी घेतला लाभ

लोणावळा : नांगरगाव येथील लोणावळा नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक विद्यालयांमध्ये आज पार पडलेल्या आधार कार्ड कॅम्प मध्ये 80 जणांनी सहभाग घेत लाभ घेतला. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थत्ते व वसुंधरा नितीन दुर्गे यांच्या माध्यमातून या आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
या आधार कार्ड कॅम्पचे उद्घाटन लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनिल गायकवाड, ॲड. पूजा तलाठी, प्रभारी मुख्याध्यापक स्वाती येवले, वसुंधरा नितीन दुर्गे, प्रदिप थत्ते, नितीन दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुशील पायगुडे, निलम कडाळे, शुभांगी पालकर, रूपाली मावळे, स्वाती दळवी, श्रावणी ठाकर, पूजा पडवळ, भूमी दाहोत्रे, राजेंद्र कदम, संतोष कापसे, विशाल दुर्गे, उमेश मोरे, संभाजी दळवी, शनी सुतार, भूपेंद्र कदम, बाळू दुर्गे, अमोल सुतार, तारू सर, सचिन साठे आदी उपस्थित होते.
सोमवारी पुन्हा आधार कार्ड कॅम्पचे आयोजन
सोमवारी 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांगरगाव, राव काॅलनी, स्वराज्य नगर, कालेकर मळा, डेनकर काॅलनी, जिजामाता नगर आणि भांगरवाडी (क्रांती काॅर्नर ते आदित्य सोसायटी) या भागातील नागरिकांसाठी आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक विद्यालय नांगरगाव येथे हा कॅम्प होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.