Breaking news

Lonavala Accident News : टायगर पाॅईटजवळ दुचाकीचा भिषण अपघात; 1 जण ठार तर दोघे जखमी

लोणावळा : येथील टायगर पाॅईट परिसरात फिरायला आलेल्या तरुणांच्या दुचाकीला एअरफोर्स जवळ भिषण अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहे. आज शुक्रवारी (2 जून) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

     मोहन ज्ञानेश्वर मोरे (वय 22, रा. मूळ पिंपळगाव सय्यदमियाँ, परभणी. सध्या राहणार बंडगार्डन पुणे) हा या अपघात मयत झाला असून श्रीराम संजय मोरे (वय 19 राहणार मूळ परभणी, सध्या बंडगार्डन पुणे) व रितेश सोमनाथ नलावडे (वय - 21, रा. टेभुर्णी, सध्या रा. पुणे) हे दोघे जखमी झाले आहेत.

    श्रीराम संजय मोरे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन मोरे व वरील जखमी दोघेजण असे तिघेजण त्याची मोटार सायकल क्र. (MH 22 AX 0873) वरुन मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर बंद असल्याने ते तेथून टायगर पाॅईट येथे फिरायला आले. टायगर पाॅईट परिसरात फिरल्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघाले असताना टायगर पाॅईट ते आयएनएस शिवाजी दरम्यान असलेल्या एअरफोर्स येथील वळण व उतारावर त्याचा मोटार सायकल वरील ताबा सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या लगत असलेल्या लोखंडी दुभाजकावर जोरात आदळल्याने हा अपघात झाला. प्रसंगावधान राखत जखमींनी रस्त्याने जाणारी एका कार थांबवत मदतीची याचना केली. सदर कार चालकाने सर्व जखमींना लोणावळ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तपासणी केली असताना मोहन मोरे हे मयत झाले असल्याचे सांगितले. तर अन्य दोघांवर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.

इतर बातम्या