Breaking news

लोणावळ्यातील ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स फेडरेशनच्या कार्यालयात चोरी

लोणावळा : रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे दरम्यान लोणावळ्यातील अलंकार फोटो स्टुडिओ शेजारी असलेल्या ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स फेडरेशनच्या कार्यालयात चोरी झाली आहे. कार्यालयात रोख रक्कम वैगेरे काही नसल्याने चोरांच्या हाती काहीही न लागल्याने त्यांनी कपाटातील साहित्य अस्थाव्यस्त फेकून दिले असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी दिली.

    फेडरेशनचे सल्लागार दादा गोसावी, खजिनदार दत्ता केदारी, सुलतान शैख, सचिव संजय गुरव व सहकारी यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला, आतमधील कपाटाचे कुलूप तोडले मात्र आतमध्ये काहीही न भेटल्याने कागदपत्रे टाकून दिली. त्यामध्ये अनेक महत्वाची कागदपत्रे होती, सुदैवाने ती कार्यालयात मिळाली असल्याचे पवार यांनी सांगितले. 


इतर बातम्या