लोणावळा उप विभागाची मोठी कारवाई; वडगाव मावळ येथे 2.5 लाखांचा गुटखा जप्त
लोणावळा : लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून वडगाव मावळ येथील संस्कृती कॉलनी येथे छापा मारत जवळपास 2 लाख 52 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने ही कारवाई केली. संकल्प नशा मुक्ती अभियान अंतर्गत विविध स्तरांवर जनजागृती करून देखील व सतत याकरिता कारवाई मोहिमा सुरू असताना देखील काही नागरिक व व्यावसायिक अवैध पद्धतीने व्यवसाय करत असल्याचे समोर येत आहे. गोपनीय माहिती मिळताच त्याठिकाणी छापेमारी करत कडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले. वरील प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात एक विधी संघर्ष बालकास अन्य दोघांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सत्यसाई कार्तीक म्हणाले, वडगाव मावळ येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून 18 मार्च रोजी सदर ठिकाणी छापा मारला असता मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ सिद्धीकी (वय 25 वर्ष, राहणार संस्कृती कॉलनी, वडगाव, मावळ) व अन्य एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 2,52,000 रूपये किमतीचा गुटखा मिळून आला आहे. प्राथमिक चौकशीत सदरचा माल हा सलमान लियाकत हुसेन सिद्दिकी (वय अंदाजे 30 वर्ष, रा.संस्कृती कॉलनी, वडगाव, जिल्हा पुणे (सध्या फरार) याचे मालकीचा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदरचा मुद्दमाल जप्त करून वर नमूद तिन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, सहायक पोलीस निरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नितेश (बंटी) कवडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे व गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली.