Breaking news

मोठी कारवाई | श्रीराम नवमीच्या पूर्व संध्येला लोणावळ्यात मोठी कारवाई; गोमास वाहतूक करणाऱ्या टेम्पो सह दोन जण ताब्यात

लोणावळा : श्रीराम नवमीच्या पूर्व संध्येला लोणावळ्यात मोठी कारवाई करण्यात आली असून कुमार पोलीस चौकी जवळ गोमास वाहतूक करणारा एक टेम्पो व दोन जणांना लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर व त्यांचे अन्य दोन साथीदार अशा चार जणांवर महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा 1976 चे कलम 9 (अ) (ब), 5 (क) (ड) अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली.

     लोणावळा शहरचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल फाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महंमद इकबाल महंमद इब्राहिम कादरी, (वय 51, रा. रहिमत कॉलनी, पुर्व बंदलगुडा, हैद्राबाद राज्य तेलंगना), शफीक महम्मद कुरेशी (कुर्ला, कुरेशीनगर मुंबई), बरकत टेम्पो सर्व्हिस लकडराम रोड इसनापुर जि. संगारेड्डी राज्य तेलंगना येथील दस्तगीर (पुर्ण नाव माहित नाही) व गोडावुन चालक (नाव माहित नाही) यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      लोणावळ्यातील गोरक्षक ओमकार शिर्के व त्यांचे सहकारी यांनी लोणावळा पोलिसांना माहिती दिली की टेम्पो क्रमांक (TG 08 T 0259) हा गोमास घेऊन मुंबईच्या दिशेने जात आहे. त्यावेळी कुमार पोलीस चौकी येथे कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमोल फाळके व त्यांचे सहकारी यांनी सदरचा टेम्पो थांबत त्याची तपासणी केली असता आत मध्ये मोठ्या प्रमाणात गोमास मिळून आले आहे. हैद्राबाद येथील एका गोडाऊन मधून हे गोमास विक्री करण्यासाठी कुर्ला, कुरेशीनगर, मुंबई भागात घेऊन जात असताना लोणावळ्यात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पाटील हे पुढील तपास करत आहेत.




इतर बातम्या