Breaking news

Expressway Accident | मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर टेम्पो व कंटेनर च्या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी टेम्पो व कंटेनर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे.

     आज रविवारी (7 एप्रिल) सकाळी 06:05 वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवर नवीन बोगद्या मध्ये किमी 39/200 दरम्यान उतारावर हा अपघात झाला. यामध्ये टेम्पो क्रमांक (GJ 15 XX 9283) वरील चालक विनोद यादव (रा. वापी, गुजरात) याचे वाहनावरील नियंत्रण सुटून टेम्पो पुढे जात असलेला कंटेनर क्रं (MH 46 BM 1169) यास पाठीमागून जोरात धडकला. या धडकेत टेम्पो वरील चालक हा केबिनमध्ये अडकून त्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मयत झाला आहे.

      अपघाताची माहिती समजताच अपघाताचे  ठिकाणी आय आर बी  पेट्रोलिंग, देवदूत टीम, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य ॲम्बुलन्स सेवा, मृत्युंजय देवदूत टीमने धाव घेत मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात आली असून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी खोपोली पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

     

इतर बातम्या