Breaking news

दुःखद घटना | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कार सुरक्षा रेलिंगला धडकून झालेल्या अपघातात पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यू

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज पहाटे 02.50 वाजण्याच्या सुमारास मुंबई बाजूस  कि.मी 05.100 येथे ईर्टीगा कार क्र. MH 43 CG 8988 यावरील चालक सुरज रामचंद्र चौगुले (वय - 55 वर्ष, पोलीस उप निरीक्षक, पार्क साईट पोलीस ठाणे, मुंबई) यांचे कार वरील नियंत्रण सुटून कार पहिल्या लेनच्या रेलिंगला जोरात धडकली. तो धक्का एवढा जोरदार होता की कार अक्षरशः रेलिंगमध्ये घुसली त्यामूळे गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू  झाला. 

     आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळस्पे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मदत कार्य केले. पोलीस अधिकाऱ्याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरचा अपघात हा पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.

इतर बातम्या