Shivsena News : लोणावळ्यात उद्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन

लोणावळा : लोणावळा शहर शिवसेना प्रभाग क्र. 10 च्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्या शनिवारी 28 जानेवारी रोजी रायवुड उद्यान लोणावळा येथे सकाळी 10 वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लहान गट इयत्ता 1 ली ते 2 री - रंग भरणे (दोन फुले व पान डहाळी), 3 री ते 4 थी - विषय - आवडते कार्टून किंवा पतंग आणि मी, मध्यम गट - 5 वी ते 7 वी - विषय - शाळेतील धावण्याची स्पर्धा किंवा बागेत खेळणारी लहान मुले, मोठा गट - 8 वी ते 10 वी - विषय - भारतीय वेशभूषेतील विविधता किंवा परग्रहावरील वातावरण व अंतराळ्यान हे विषय देण्यात आले आहे.