Breaking news

मराठा उद्योजक लाॅबी परिवाराकडून मराठा व्यावसायकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

पिंपरी चिंचवड : मराठा उद्योजक लॉबी परिवार पुणे यांच्या वतीने मराठा बंधू भगिनींसाठी व्यावसायीक मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रत्येक मराठी व्यावसायिक बांधवांनी त्यांची व्यवसायिक ओळख करून दिली. तदनंतर रोहन देशमुख व सायली भोसले यांनी प्रस्तावना मांडताना मराठा उद्योजक लॉबीची स्थापना, कार्यपद्धती त्याचबरोबर मराठा बांधवांनी खरेदी आपल्याच बांधवांकडून का करावी व कशी करावी? व्हाट्सअप/ फेसबुक व सोशल मिडियाच्या माध्यमातून कसे मार्केटिंग करावे व त्यातून कसा फायदा होतो याबाबत माहिती दिली. शिवगारदेच्या घोषणेत प्रमुख वक्ते कृषिकण्या श्रध्दा ढवण (ढोरमले), उद्योजक गजानन वायाळ व राजेंद्र औताडे (संपर्कप्रमुख - मराठा उद्योजक लॉबी, मराठवाडा), केडी ऊर्फ कुलदीप पाटील यांच्या हस्ते शिव प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

कृषी कन्या श्रध्दाताई ढवण (ढोरमले) यांनी महिलांना व्यवसायातात उपलब्ध संधी व व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी समस्या यावरील उपाय याविषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांचा सन्मान कल्याणी बाराथे- खैरनार (महिला ॲडमिन, MUL पुणे शहर) यांच्या हस्ते करण्यात आला. गजानन वायाळ यांनी फ्रांचायजी व्यवसायात उपलब्ध संधी, फायदे व सावधगिरी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच लॉबी मधील कोणालाही याकामी काही मदत लागल्यास 100 % सहकार्य करण्याचे जाहीर केले. त्याचा सन्मान पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख वैभव फरतडे व केडी उर्फ कुलदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर यशस्वी उद्योजकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

 यावेळी शंकभाऊ चव्हाण यांच्या दुनियादारी कट्टा - मसाला दूध या  व्यवसायाचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीप्रमाणे कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वैभव फरतडे संपर्कप्रमुख, MUL पश्चिम महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली केडी उर्फ कुलदीप पाटील व नियोजन टीम सदस्यांनी केले. सायली भोसले व रोहन देशमुख यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. मार्गदर्शन शिबिर यशस्वी करण्यासाठी पवन निकम, अविनाश पडोळे, चंद्रकांत आहेर, लखन सावंत, चंद्रकांत लांबे, दिलीप कदम, विकास गरड, ज्ञानेश्वर भांगे, डॉ. धैर्यशील शितोळे, गुलाब भापकर, अजित वाघमारे, राज फुगे, शंकर चव्हाण व अमित सातपुते यांनी मदत केली.

इतर बातम्या