Breaking news

Maval Loksabha Election | खासदार श्रीरंग बारणे यांनी शक्तिप्रदर्शन करत तिसऱ्यांदा भरला मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज

लोणावळा : शिवसेना शिंदे पक्षाचे महायुतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे यांनी आज मंगळवारी तिसऱ्यांदा मावळ लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी महायुतीच्या घटकपक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे आदी सहभागी झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पत्रकारांशी काहीही न बोलता उपस्थितांना अभिवादन करून निघून गेल्याने चर्चेला उधाण आले होते.

इतर बातम्या