Breaking news

श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारचा फार मोठ्या फरकाने केलेला पराभव, मी व येथील राष्ट्रवादीचे मतदार विसरलेले नाहीत - रोहित पवार

मावळ माझा न्युज नेटवर्क : 2019 च्या निवडणुकीमध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचा मुलगा व माझा भाऊ पार्थ पवार याचा पराभव केला. फक्त पराभव केला नाही तर फार मोठ्या फरकाने पराभव केला. हा पराभव अजितदादा विसरले असले तरी भाऊ म्हणून मी विसरणार नाही व पार्थ याचा प्रचार करणारे मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील विसरणार नाहीत. या निवडणुकीमध्ये या पराभवाचा बदला संजोग वाघेरे यांच्या रूपाने घेतला जाईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. रोहित पवार म्हणाले अजित दादा पवार साहेबांना वडिलांच्या जागी मानायचे. मात्र आज तिकडे त्यांनी त्यांची साथ सोडली आहे व इकडे मुलाचा पराभव करणाऱ्यांला साथ देत आहेत. त्यांच्या प्रचाराला व उमेदवारी अर्ज भरायला येत आहेत. काय वेळ अजित दादांवर आली आहे. अजित दादा मुलाचा पराभव विसरले असले तरी मी व पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत व ते हा पराभव अद्यापही विसरलेले नाहीत. या निवडणुकीमध्ये या पराभवाचे उटे येथील मतदार काढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

      रोहित पवार म्हणाले, मला अजित दादांनी AB फॉर्म दिला होतो असे सांगितले ते काही प्रमाणात सत्य आहे. त्यावेळी शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर विश्वासाने ती जबाबदारी दिली होती. तसेच मी आमदार किंवा खासदार निवडणूक लढवावी अशी साहेबांची इच्छा होती मात्र मी जिल्हा परिषद पासून निवडणूक लढवत वर जायचे असे ठरवले होते. आज अजितदादा जे सांगत आहेत ते अर्धे खरे व अर्धे खोटे आहे. काही दिवसात ते शंभर टक्के खोटं बोलतील कारण ते भाजपाच्या सानिध्यात आहे व भाजपावळे शंभर टक्के खोटं बोलत असतात असा टोला भाजपला लगावला. रोहित पवार यांना मावळात फिरू देणार नाही असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी दिले होते. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, मी ते आवाहन स्वीकारले आहे. आता शेळके यानी खुल्या व्यासपीठावर मला व अजितदादा यांना एकत्र पत्रकार परिषदेला बोलवावे, अजित दादांच्या प्रश्नांची उत्तरे मी देईल पण माझ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे आहेत का हे देखील सर्वांना समजेल व दूध का दूध व पाणी का पाणी होईल असे खुले आवाहन देखील रोहित पवार यांनी दिले आहे.

इतर बातम्या