Breaking news

Maval Loksabha Election | महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे उद्या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी त्यांच्या समर्थकांकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणारा असून भव्य स्वरूपात रॅलीचे आयोजन व तदनंतर सभा देखील घेतली जाणार आहे. 

     संजोग वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाळाराम पाटील शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्यासह महाविकास आघाडी मधील मावळ लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधान सभा क्षेत्रातील मुख्य पदाधिकारी व त्यांचे समर्थक कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

     श्री काळभैरवनाथ मंदिर पिंपरीगाव, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, साई चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक शगुन चौक, काळेवाडी, चिंचवडगाव, मोरया गोसावी गणपती मंदिर चिंचवड, वीर चाफेकर बंधू स्मारक, चिंचवड स्टेशन, श्री खंडोबा मंदिर आकुर्डी अशी ही रॅली सकाळी साडेनऊ वाजता निघणार आहे. नंतर ही पदयात्रा खंडोबामाळ चौक, म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन येथे येऊन PMRDA कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल करून आकुर्डी रेल्वे स्टेशन याठिकाणी जाहीर सभा होणार आहे. 



इतर बातम्या