Breaking news

Maval Loksabha Election | मावळ लोकसभेसाठी तब्बल 38 उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवसा पर्यंत तब्बल 38 उमेदवारांनी 50 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उद्या 26 एप्रिल रोजी या अर्जांची छाननी करण्यात येणार असून वैध अर्जांपैकी ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायची आहे त्यांना 29 एप्रिल पर्यंत वेळ देण्यात आला आहे. 29 एप्रिल नंतर मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये किती उमेदवार असणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने हा विषय सर्वत्र चर्चेला जात आहे.

     मावळ लोकसभेसाठी 75 होऊन अधिक उमेदवारी अर्ज घेण्यात आले होते यापैकी 38 जणांनी 50 उमेदवारी अर्ज दाखल केले आहे प्रामुख्याने यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी महापौर संजोग वाघेरे पाटील महायुतीच्या वतीने शिवसेना पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माधवी जोशी यांच्यासह काही प्रादेशिक पक्ष व अपक्ष उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दाखल अर्जांची उद्या 26 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून महायुतीच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने प्रचाराचा नारळ वाढवत अधिकृतपणे प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे वास्तविक पाहता मागील दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे मतदारसंघांमध्ये मतदारांच्या व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्यासाठी उशीर झाल्याने बारणे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मित्र पक्षांमधील नाराज नेते मंडळींच्या गाठीभेटी घेत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे नेतेमंडळी सध्या बारणे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय झाले असले तरी सर्वसामान्य मतदार व पक्षांचे कार्यकर्ते आज देखील संजोग वाघेरे यांच्या सोबत असल्याचे चित्र मावळ विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे काही प्रमाणामध्ये हाच प्रकार मावळ लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी पहायला मिळत आहे.

महत्वाच्या ठळक बातम्या देखील वाचा

मावळ लोकसभेसाठी आता लोणावळ्यातून देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; भांगरवाडीतून उमेदवारी अर्ज दाखल

महाविकास आघाडीच्या वतीने लोणावळ्यात संजोग वाघेरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ; मशाल घराघरात पोहचवण्याचा केला संकल्प

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा येथे जागतिक हिवताप दिन साजरा

नागरिकांना जाहीर आवाहन | लोणावळ्यात सम व विषम तारखेप्रमाणे वाहन पार्किंग करा; अन्यथा पोलीस करणार कारवाई

     

इतर बातम्या