Breaking news

लोणावळ्यात रात्री उशिरा एका बंगल्यात गोंधळ घालणा-या हुल्लडबाजावर कारवाई, 9 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये एका बंगल्यात रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टिम च्या तालावर नर्तिकांसोबत नाचत हुल्लडबाजी करत सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या दहा जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री 12 नंतर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सहा मुलींचा समावेश असून पोलीस आल्याची चाहूल लागताच काही तरुण घटनास्थळावरून पळून गेले आहेत. त्यांच्या चारचाकी गाड्या देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

      लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक म्हणाले, लोणावळा शहरात तुंगार्ली परिसरातील एस 4 नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत साऊंड सिस्टम लावून मोठमोठ्याने गाणी लावुन त्यांनी सोबत आणलेल्या मुलींकडुन अश्लिल हावभाव करुन नाच करायला लावत आहेत अशी गोपणीय माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी व लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांचेकडील पोलीस स्टाफ यांची संयुक्त टिम तयार करत करवाई करण्यात आली. यामध्ये 9 जणांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातील साउंड सिस्टम जप्त करुन त्यांच्या लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            लोणावळा शहर व परिसरातील बंगले मालकांनी त्यांच्या कडील बंगले भाड्याने देताना बंगल्या मध्ये कोणतेही बेकायदेशीपणे कृत्य होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. बंगला भाड्याने दिलेली माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी अन्यथा त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सत्यसाई कार्तिक व पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले. त्याच प्रमाणे लोणावळा शहरातील भाड्याने दिले जाणा-या बंगल्याची माहिती संकलित करण्याचे काम लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडुन करण्यात आले असल्याचे सांगितले.

      सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक सत्यासाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या सूचनेनुसार पोलीस उप निरीक्षक श्रीकांत जोशी, पोलीस हवालदार मयूर आबनावे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई सोनवणे, महिला पोलिस शिपाई निंबाळकर, पोलीस शिपाई शिंदे, येळवंडे, घोंगडे, पवार यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जोशी हे करत आहेत.

इतर बातम्या