Breaking news

Accident News | जुन्या पुणे मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ बाईक रायडर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

लोणावळा : लोणावळ्या जवळील शिलाटणे फाटा येथे आज सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीवरून वेगात जात असलेल्या बाईक रायडरला पिकअप टेम्पोने धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात बाईक रायडरच्या बाईकचा चक्काचूर झाला असून या अपघातात बाईक रायडर तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

       लोणावळा येथे विकेंडला मुंबई पुण्यावरून अनेक बाईक रायडर येत असतात. त्यांच्या गाड्यांचा वेग देखील जास्त असतो. अतिशय वेगाने हे बाईक रायडर गाड्या पळवत असतात. त्यांच्या गाड्याच्या आवाजाने धडकी भरते अशा पद्धतीने त्या गाड्या जात असतात. वेगात जाणाऱ्या या बाईक रायडर तरुणांच्या वेगावर नियंत्रण पोलिसांनी ठेवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

इतर बातम्या