Maval News l अखिल गुरव समाज संघटनेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी नवनाथ देशमुख यांची निवड जाहीर

लोणावळा : अखिल गुरव समाज संघटनेच्या मावळ तालुका अध्यक्षपदी देवघर येथील नवनाथ देशमुख यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सोबतच मावळ तालुक्याची कार्यकारणी देखील घोषित करण्यात आले आहे.
अखिल गुरव समाज संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.आण्णासाहेब शिंदे व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितलदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व पुणे जिल्हा प्रभारी संतोष वाघमारे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा अध्यक्ष शंकर शिर्के यांनी मावळ तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे.
मावळ तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष : नवनाथ देशमुख, कार्याध्यक्ष : महेंद्र शिर्के, उपाध्यक्ष : विष्णू घनवट, खजिनदार : कैलास गायकवाड, सह खजिनदार : शिवाजी ठोसर, सल्लागार : दुर्गा देवाडे, सल्लागार : शंकर ठोसर, महिलाध्यक्षा : अनिता गुरव, महिला कार्यकारी अध्यक्षा : मनिषा नाणेकर, महिला कार्याध्यक्षा : पल्लवी गुरव, महिला उपाध्यक्षा : स्वाती खालखोने, युवाध्यक्ष : भरत नाणेकर, युवा उपाध्यक्ष : संतोष घनवट, देवस्थान समिती प्रमुख : सखाराम घनवट, देवस्थान समिती उपप्रमुख : राजु कदम, संघटक : सदाशिव देशमुख, प्रचार प्रसिद्धी प्रमुख : शंकर देशमुख