मैत्रीला जिवापाड जपणारी माणसं या थीमवर आधारित फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडेचा दशवार्षिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे : गेली दहा वर्षे विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडेचा दशवार्षिक स्नेहमेळावा दिनांक 28 जून 2025 रोजी श्रीरंग कलानिकेतन सभागृहात उत्साहात पार पडला. "मैत्रीला जिवापाड जपणारी माणसं" या सुंदर थीमवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगावात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, गरजू व्यक्तींना कपडे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आर्थिक मदत, आरोग्य तपासणी शिबिरे, गडकिल्ले स्वच्छता अभियान, ट्रेकिंग, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने राबवण्यात आले आहेत.
या मेळाव्याच्या निमित्ताने गटातील सभासदांसाठी कौटुंबिक स्नेहबंधन वृद्धिंगत करण्याचा हेतू होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मोहन बनसोडे (समुपदेशन अधीक्षक, येरवडा मनोरुग्णालय) यांच्या "ताण-तणाव व्यवस्थापन" या विषयावरील मार्गदर्शनाने झाली.
कार्यक्रमात लहान मुलांसाठी गमतीशीर खेळ आणि महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय इयत्ता दहावी, बारावी आणि विविध शाखांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचाही गौरव यावेळी करण्यात आला. सर्व विजेत्यांना बक्षिसे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. फ्रेंड्स ग्रुपने गेल्या दशकात तळेगावातील स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, गरजूंना मदत, शैक्षणिक साहित्य वितरण, आरोग्य तपासणी शिबिरे, गड-किल्ले स्वच्छता मोहीम, ट्रेकिंग, वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव भालशंकर, सुहास धस, संदीप कांबळे, नवनाथ आडकर, बजरंग सूर्यवंशी, सुरेश पाटील, हरिश्चंद्र शिवदे, दत्तात्रय जाधव, मनोहर खुणे, शिल्पा पवार आणि इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन संजय ठाकर, मनोज क्षीरसागर व चंद्रकांत उंडे यांनी केले. प्रास्ताविक सहदेव डोंबे यांनी तर आभार प्रदर्शन अशोक कराड यांनी केले.