Breaking news

Maval News l मावळातील भात लागवड व पीक विमा संदर्भात शिवसेनेचे निवेदन

वडगाव मावळ : मावळ तालुका हा पारंपरिकरित्या भात पिकासाठी ओळखला जातो. मात्र, यंदा पावसाळा अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाल्याने भात लागवडीसाठी आवश्यक असलेली रोपे कमी प्रमाणात उगवली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील भात पिकाचे तसेच इतर पिकांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी मावळ शिवसेनेच्या वतीने कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

       निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, यंदा किती हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे, तसेच किती क्षेत्रात नुकसान झाले आहे, याबाबत तपशीलवार माहिती प्रसिद्ध करण्यात यावी. यासोबतच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या, तसेच पीडीसीसी बँकेमार्फत कर्ज घेताना स्थानिक सोसायट्यांमार्फत किती शेतकऱ्यांचे पीक विमा उतरवण्यात आले आहे, याचीही माहिती उपलब्ध करून द्यावी. शिवसेनेने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे, आणि त्यांचे पिकांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपासून वंचित ठेवू नये. प्रशासनाने या संदर्भात तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

इतर बातम्या