Breaking news

खंडाळा घाटात कंटेनर पुलावरून खाली कोसळला

खोपोली : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील किमी 38/700 जवळ आज सकाळी एक कंटेनर पुलावरून खाली कोसळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हालविण्यात आले आहे. पुलावरून कंटेनर खाली पडल्याने केबिनचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस तसेच देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल होत त्यांनी केबिनमधून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी दाखल केले.

इतर बातम्या