Breaking news

Lonavala News : वलवण बापदेव रोड वरील दुकानात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकवण्याच्या प्रयत्न; घटना सीसीटिव्ही मध्ये कैद

लोणावळा : वलवण बापदेव रोडवरील एका जनरल स्टोअर मधील महिलेकडे पिण्याच्या पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकी वरील दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याच्या प्रयत्न केला. रविवारी (19 मे) रात्री 8.36 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सुदैवाने तुटलेले मंगळसूत्र हे दुकानातच पडल्याने मोठी चोरी टळली. मात्र ही घटना व चोरट्याचा चेहरा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मागील काही दिवसात अशा प्रकारे चोरीचे प्रकार घडले आहेत. दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे ऐवज चोरण्याचा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी मॉर्निंग वॉक व रात्री जेवणानंतर शतपावली साठी अनेक नागरिक रस्त्यावर फिरत असतात. पोलिसांनी या घटनेची दखल घेत हद्दीत गस्त वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच सीसीटिव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचे चेहरे व दुचाकी गाडी स्पष्ट दिसत असल्याने त्याचा आधार घेत शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

इतर बातम्या