Breaking news

Lonavala | महायुतीचे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवार बाजार व पांगरे चाळ परिसरात संवाद दौरा

लोणावळा : मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी लोणावळा शहर महायुतीच्या वतीने शुक्रवारचा आठवडे बाजार व पांगारे चाळ परिसरामध्ये संवाद दौरा करत मतदारांना खासदार बारणे यांच्या कार्य अहवालाचे वाटप करण्यात आले.

       शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय ( A), रासप, मनसे, एसआरपी या घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरात प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा सुरू आहे. शुक्रवार (3 मे) लोणावळा शहरातील पांगारे चाळ, निसर्गनगरी, म्हाडा कॉलनी, कैलासनगर, शुक्रवार बाजार, हनुमान टेकडी या विभागात हा प्रचार दौरा संपन्न झाला. महायुतीचे पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले. यावेळी प्रभाग प्रचारात महायुतीचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

इतर बातम्या