Maval News : दारुंब्रे येथे विविध रोग निदान तपासणी शिबिर संपन्न

तळेगाव दाभाडे : हीलींग हँड्स फाउंडेशन आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्र दारुंब्रे, मॉन्डेलिझ इंडिया फुड्स प्रा. लि., बाल रक्षा भारत (सेव द चिल्ड्रन) यांच्या संयुक्त विद्यमानाने मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकारावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
हिलींग हँडस फाउंडेशनचे डॉ अश्विनी परगेवार यांनी रुग्णांची तपासणी करत संतुलित आहार कसा असावा यावर मार्गदर्शन केले. तपासणी नंतर रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली. आनंद मिसाळ यांचे देखील या शिबिराला मोलाचे सहकार्य लाभले.
बुधवारी (13 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 ते 2 या दरम्यान सदर शिबिर घेण्यात आले. यामध्ये 69 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र दारुंब्रे कडून डॉ प्रिन्सि डेव्हिड (मेडिकल ऑफिसर), केतन जाधव(Mpw), मोंडेलिझ इंडिया प्रा लि. सेव्ह द चिल्डन बाल रक्षा भारत कडून पूनम गायकवाड (समुपदेशक), रवींद्र ठाकरे (समुपदेशक), आशा वर्कर वैशाली बळवंत वाल्हेकर, गायत्री संतोष जाधव (आशा वर्कर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच उमेश आगळे यांनी कार्यक्रमा साठी मोलाचे योगदान दिले. अनिता सैद (शिबीर व कार्यक्रम व्यवस्थापक), मधुरा भाटे (संस्था समनव्यक) यांनी शिबिराचे पूर्ण नियोजन केले होते. आजरांविषयी योग्य माहिती व मार्गदर्शन गावोगावी पोहोचवण्याचा डॉ अश्विन पोरवाल (अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन), डॉ स्नेहल पोरवाल (सेक्रेटरी हींलिंग हॅन्डस
फाउंडेशन) यांचा प्रयत्न आहे.