ठाण्यात उद्योग सखी - उद्योग मित्र संकल्पना; 150 जणांना प्रमाणपत्र वाटप

मावळ माझा न्युज : ठाण्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने उद्योग सखी व उद्योग मित्र अशी नवीन संकल्प राबविण्यात आली. त्याची सुरुवातच ठाण्यापासून करण्यात आली. यावेळी 150 जणांना भाजपा उद्योग आघाडी सखी व मित्र प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे आमदार निरंजन डावखरे तसेच भारतीय उद्योग आघाडी महिला अध्यक्ष सेजल कदम व भारतीय उद्योग आघाडी उपाध्यक्ष प्रकाश पोरवाल उपस्थित होते. त्यावेळेस दीडशे लोकांना उद्योग आघाडी सखी व मित्र प्रमाणपत्र वाटण्यात आले. त्यावेळी बोलताना प्रकाश पोरवाल म्हणाले, सदर संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल व मोठ्या प्रमाणावर उद्योग आघाडी कडून उद्योगसखी व उद्योग मित्र यांच्या नियुक्ती करण्यात येईल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्योग धंद्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या दूर होण्यास मदत मिळेल. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढवून बेरोजगारी कमी होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारताला महासत्ता बनवण्याचे जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी काम करत आहे.