Breaking news

Lonavala News | दुचाकी वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पळवला पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज

लोणावळा : ठोंबरेवाडी भागातील एक महिला रायवुड येथून घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून चोरून नेला आहे. काल 11 मार्च रोजी सायंकाळी 06.20 वाजण्याच्या सुमारास ट्रायोज मॉल समोर ही घटना घडली.

     याप्रकरणी राजश्री मोहन केदारी राहणार ठोंबरेवाडी यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 392 34 प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक सोन्याची चैन व एक मनी मंगळसूत्र असा साधारण 56 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी हिसकावून पळवून नेला आहे.

     केदारी ह्या काल सायंकाळी ठोंबरेवाडी येथे घरी पायी जात असताना रायवुड भागातून दुचाकी वर आलेल्या साधारणतः 20 ते 25 वयोगटातील दोन तरुणांपैकी दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या गळ्यातील चैन व मंगळसूत्र याला हिसका देऊन ते हिसकावून घेतले. सदरची दुचाकी ही भुशी धरणाच्या दिशेने गेली आहे. या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर त्यांनी सदर परिसरामधील सीसीटीव्ही ताब्यात घेतली आहेत. आरोपी त्यामध्ये कैद झाले असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.

      या प्रकरणी लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जोशी हे घटनेचा तपास करत आहेत.



इतर बातम्या