Breaking news

गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन जण इंद्रायणी नदीपात्रात बुडाले

आळंदी : आळंदी येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी इंद्रायणी नदीवर गेलेले दोन जण नदीपात्रात बुडाले आहेत. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसर्‍याचा शोध सुरू आहे. आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

     मिळालेल्या माहितीनुसार हवालदार वस्ती आळंदी रोड येथील उत्तरेकडे असलेल्या इंद्रायणी नदीवर माऊली वस्ती, डुडळगाव येथील ठोंबरे कुटुंबातील नागरिक 6 वाजण्याच्या दरम्यान गणेश विसर्जना करीता नदीपात्रावर गेले होते. यावेळी पाण्यात मुर्ती विसर्जनसाठी मध्यभागी गेलेले दत्ता आबासाहेब ठोंबरे (वय 20) व प्रज्वल रघुनाथ काळे (वय 18) हे पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. इतरांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेले भोसरी एमआयडीसी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानांनी शोध घेतला असता प्रज्वल काळे यांचा मृतदेह पाण्यात मिळून आला असून दत्ता ठोबरे यांचा शोध चालू आहे.

इतर बातम्या